बडोद्यात 85 व्या मराठी संमेलनला नकार

August 3, 2011 12:47 PM0 commentsViews: 6

03 ऑगस्ट

85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनआयोजित करायला बडोदा वाङ्मय मंडळाने स्पष्टपणे नकार दिला आहे. काही अपरिहार्य कारणामुळे संमेलन आयोजित करु शकत नसल्याचे पत्र, बडोदा वाडमय मंडळाने साहित्य महामंडळाला पाठवले आहे.

तसेच महामंडळ आणि आयोजन समितीत कुठलाही वाद नसल्याचे स्पष्टीकरणही आयोजन समितीनं दिले. 85 अखिल भारतीय मराठी साहित्या संमेलन याआधी नियमबाह्य निवडणूक प्रक्रियेमुळे वादग्रस्त ठरलं होतं.

मतदार यादी तयार न करता आणि संमेलनाचे स्थळ निश्चित न करता महामंडळाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली होती. हे प्रकरण आयबीए-लोकमतने समोर आणल्यानंतर महामंडळाला निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलावी लागली. आता त्या पाठोपाठ आयोजन समितीने हे संमेलन घ्यायलाच नकार दिल्याने पुन्हा एकदा नवा पेच निर्माण झाला.

close