आदर्श सोसायटीशी संबंध नाही – राणे

August 3, 2011 5:45 PM0 commentsViews: 1

03 ऑगस्ट

आदर्श सोसायटीशी माझा काहीच संबंध नाही असा खुलासा नारायण राणे यांनी आज विधानसभेत केला. मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे परवानगीसाठी अर्ज आला होता. मी त्यावर फक्त त्वरीत कारवाई करा असा शेरा मारला होता. असा खुलासा नारायण राणे यांनी केला.

बॉम्बस्फोटावरच्या चर्चेनंतर विरोधकांनी सभात्याग केला नाही. पण काल माझ्यावर टीका केल्यानंतर सभात्याग केला. अशी टीकाही राणे यांनी यावेळी केली. तसेच नारायण राणे यांनी खालापूर रेव्ह पार्टीत शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांचा मुलगा आणि सून सहभागी असल्याचा आरोप केला.

तर नागपूरच्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आपला आदर्श मध्ये सहभाग नसल्याचे नमुद केले होते तरी सुध्दा शिवसेनेचे नेते आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे असं ही राणे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, राणे यांच्या खुलाशानंतर सुभाष देसाई यांनी राणे यांच्यावर केलेल्या आरोपावर आपण ठाम आहोत. आदर्श सोसायटीमध्ये राणे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे फ्लॅट असल्याच्याच आरोप सुभाष देसाई यांनी केला. मात्र खालापूर रेव्ह पार्टीमध्ये सुभाष देसाई यांचा मुलगा आणि सून असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. त्यावर थेट बोलण्याचं मात्र सुभाष देसाई यांनी टाळलं.

close