युवराज, हरभजन आऊट ; कोहली, ओझा इन

August 3, 2011 1:11 PM0 commentsViews: 12

03 ऑगस्ट

भारतीय टीममध्ये दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या आता वाढतच चालली आहे. युवराज सिंग आणि हरभजन या आणखी दोन खेळाडूंची या यादीत भर पडली. दुसर्‍या इनिंगमध्ये युवराज सिंगला बॅटिंग करताना डाव्या हाताला दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने युवराज सिंग इंग्लंडविरुध्दच्या सीरिजमधूनच बाहेर पडला आहे.

ट्रेंट ब्रिज टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये युवराज सिंनं हाफसेंच्युरी केली होती. भारताचा स्पीन बॉलर हरभजन सिंगही दुखापतग्रस्त झाला. हरभजन सिंगच्या पोटाचे स्नायू दुखावले आहेत. त्याला त्याला दहा दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला.

त्यामुळे तिसर्‍या टेस्टमध्ये हरभजन खेळणार नाही. हरभजन सिंगने दुसर्‍या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 4 तर दुसर्‍या इनिंगमध्ये फक्त 9 ओव्हर टाकल्या आणि त्याला केवळ एकच विकेट घेता आली होती. युवराज आणि हरभजन ऐवजी टीममध्ये विराट कोहली आणि प्रग्यान ओझाला संधी देण्यात आली.

close