डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाची बोटे भाजली !

August 3, 2011 4:35 PM0 commentsViews: 5

03 ऑगस्ट

उपचारादरम्यान डॉक्टरांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे एका नवजात अर्भकाच्या हाताची बोटं भाजल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात घडला.आठ दिवसांच्या या बाळाला उपचारासाठी पिंपरी-चिंचवडच्या वाय.सी.एम रुग्णालयात दाखल केलं होतं.

त्यावेळी डॉक्टरांनी बाळाला वॉर्मरमध्ये ठेवल होतं. वार्मरची हीट जास्त झाल्यामुळे बाळाच्या उजव्या हाताची चार बोटे पूर्णपणे भाजली. हा प्रकार केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असल्याचा आरोप बाळाच्या नातेवाईकांनी केला. मात्र डॉक्टरांनी हे सगळे आरोप फेटाळले.

बाळाच्या हाताला जंतुसंसर्ग झाल्यामुळे बाळाच्या हाताला लागल्याचे डॉक्टरांच म्हणणं आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी डॉक्टरांनी बाळाच्या बोटाला भाजल्याने काय उपचार करावेत याबद्दल रेडिओलॉजिस्टला पत्रं लिहीलं होतं. याबद्दल डॉक्टरांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. बाळावर मोफत उपचार करावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या बाळाच्या नातेवाईकांनी केली.

close