नालेसफाईऐवजी घोटाळ्यांची सीआयडी चौकशी करा – उध्दव ठाकरे

August 5, 2011 10:04 AM0 commentsViews: 4

05 ऑगस्ट

मुंबईतल्याच खड्‌ड्यांवर इतकी चर्चा का ? मुंबईतल्या नालेसफाईची चौकशी कशाला पाहिजे. असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केला. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. नालेसफाईची सीआयडी चौकशी करायची असेल तर भ्रष्टाचाराचीही सीआयडी चौकशी करायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करतानाच त्यांनी कलमाडींवरही जोरदार टीका केली.

बुधवारी विधानसभेत नालेसफाईची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली होती. मुंबईमध्ये मुद्दाम कचर्‍याचे ढिग उभे करुन सफाईचे टेंडर काढले जातात असा टोला जाधव यांनी शिवसेनेला मारला होता. या घोषणेचा समाचार घेत उध्दव ठाकरे यांनी तोफ डागली. नेहमी मुंबईच का टार्गेट केली जाते. खड्डे काय कुठे पडत नाही का जर खड्‌ड्यांनी चौकशी करायची असेल तर अगोदर ती बुजवून दाखवावी. नालेसफाईच्या सीआयडी चौकशीऐवजी सरकारने राज्यात झालेल्या घोटाळ्यांनी चौकशी करावी अशी मागणी उध्दव ठाकरेंनी केली.

close