खालापूर रेव्ह पार्टी प्रकरणी 52 जण दोषी

August 5, 2011 10:26 AM0 commentsViews: 11

05 ऑगस्ट

खालापूर रेव्ह पार्टी प्रकरणी कालीना फोरेन्सिक लॅबने आपले रिपोर्ट दिले. या रिपोर्टमध्ये 298 पैकी 52 जण वैद्यकीय चाचणीत पॉझेटिव्ह आढळले. यात अनिल जाधवने अमली पदार्थ घेतल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झालंय. पाटील मुंबई ऍन्टी नार्कोटीक्स सेलचे पीआय होता. अनिल जाधव हा प्रकरणी अटकेत आहे.

27 जुनला खालापूर इथे रेव्ह पार्टी झाली होती. यामध्ये 60 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. खालापूरमध्ये झालेल्या या रेव्ह पार्टीत अनेक बड्या हस्तींचे सुपुत्र सापडले होते. त्यामुळे या रेव्हपार्टीच्या तपासाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. या रेव्हपार्टीत शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि त्याच्या सुनबाई होत्या. त्याचबरोबर इंडियन आयडॉल अभिजीत सावंतही होता असा आरोप राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला होता.

close