लोकपाल विधेयक संसदेत सादर भाजप-डाव्यांचा गदारोळ

August 4, 2011 12:24 PM0 commentsViews: 2

4 ऑगस्ट

अखेर लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यात आलंय. नारायण स्वामी यांनी हे विधेयक मांडलं. पण सरकारच्या या विधेयकातील काही तरतूदींना आक्षेप घेत भाजप आणि डाव्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. लोकपालच्या कक्षेत पंतप्रधानांना आणण्यास सरकार तयार नाही, मात्र भाजपने पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत असावे अशी मागणी करत विरोध केलाय. आता हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवलं जाणार आहे. यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभा दुपारपर्यंत तहकबू करण्यात आली होती.

close