दयानंद पांडेला 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

November 14, 2008 1:54 PM0 commentsViews: 3

14 नोव्हेंबर नाशिकदीप्ती राऊतमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या उत्तरप्रदेशामधील दयानंद पांडे या संशयिताला एटीएसनं मुंबईत आणलं. त्यानंतर त्याला नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं. नाशिक कोर्टाने दयानंद पांडेला 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याची आता नार्को, ब्रेनमॅपिंग आणि पॉलिग्राफी टेस्ट होणार आहे. त्याच्या आश्रमाच्या वेबसाईटवर या स्वंयघोषित धर्मगुरुचे राजकीय नेत्यांपासून ते चित्रपट कलावतांबरोबर अगदी जवळचे संबध असल्याचं दिसतं. दरम्यान पोलीस तपासात आपला छळ होतोय, अशी तक्रार दयानंद पांडेने केली. कुठल्याही प्रकारच्या टेस्टसाठी आपण तयार आहोत. परंतु खोट्या गुन्ह्यात मला फसवलं जाण्याची शक्यता आहे, असा आरोप त्याने केला आहे. दरम्यान, एटीएसनं चेतन आनंद नावाच्या एका इसमाला मुंबईतल्या कांदिवलीतून ताब्यात घेतलं. स्फोटासाठी हवालामार्फत पैसे पुरवण्यात आले त्यामध्ये चेतन आनंदचा हात आहे, असा पोलिसांना संशय आहे. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याशीही चेतन आनंदचे संबंध आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

close