सिब्बल यांची लायकी नाही – अण्णा हजारे

August 5, 2011 11:28 AM0 commentsViews: 3

05 ऑगस्ट

लोकपाल विधेयकावरुन केंद्र सरकारविरोधात अण्णांनी रणशिंग फुंकलं आहे. काल सरकारच्या लोकपाल विधेयकाच्या मसुद्याची होळी केल्यानंतर आता अण्णांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांच्यावर हल्लाबोल केला. सिब्बल यांची त्यांच्या पदावर राहण्याची लायकी नाही, अशा मंत्र्यांमुळेच देशाचे नुकसान होत आहे असा आरोपही अण्णांनी केला. तसेच सोनिया गांधींची प्रकृती लवकर बरी व्हावी अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

अण्णांच्या टीमने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत घेतलेल्या जनमत चाचणीत पोलमध्ये 85 टक्के लोकांनी अण्णांच्या मसुद्याला पाठिंबा दिला. दिल्लीतल्या चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात ही चाचणी घेण्यात आला. हा मतदारसंघ काँग्रेसच्या कपिल सिबल यांचा आहे. इथल्या एकूण 40 लाखांपैकी सुमारे 80 हजार मतदारांना प्रश्नपत्रिका देऊन हा पोल घेण्यात आला.

यात लोकांनी लोकपालच्या सरकारी मसुद्याला नाकारले आणि अण्णांच्या मसुद्याला भरभरून प्रतिसाद दिला असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. आज राळेगणसिध्दी येथे अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बातचीत केली. कपिल सिब्बल यांनी पहिल्यापासुन फसवणूक केली आहे. भूषण यांनी विनाकारण सीडी प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. एका बाजुला लोकपालवर लोकप्रतिनिधी समितीशी चर्चा करणे आणि दुसरीकडे फसवणूकीचे षडयंत्र सिब्बल यांनी रचले असा आरोप अण्णांनी केला. केंद्रीय मंत्रीपदावर राहण्याची सिब्बल यांची लायकी नाही. जर लायक असते तर चांगला कायदा तयार केला असता. सिब्बल हे देशाची फसवणूक करत आहे. असा आरोप अण्णांनी केला.

close