प्राध्यापिकेचा लैंगिक छळ प्रकरणी विभागप्रमुखाला अटक

August 5, 2011 7:35 AM0 commentsViews: 1

05 ऑगस्ट

शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापिकेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी विद्यापीठातील भुगोल विभागाचे विभागप्रमुख के.सी.रमोत्रा यांना अटक करण्यात आली. गेल्या सहा महिन्यापासुन या लैंगिक अत्याचार प्रकरणाची विद्यापीठ परिसरात चर्चा होती. विद्यापीठ प्रशासनाकडून न्याय मिळेल या आशेवर संबधित महिला प्राध्यापिका वाट पाहत होत्या. पण विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळत नसल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. आणि त्यांनी विभागप्रमुख के.सी.रामोत्रा यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ विभागप्रमुख कें.सी.रामोत्रा यांना अटक केली.

close