बँक कर्मचारी एक दिवसाच्या संपावर

August 5, 2011 12:47 PM0 commentsViews: 7

05 ऑगस्ट

देशभरातील बँकिंग कर्मचारी आज एक दिवसाच्या संपावर आहेत. 26 नॅशनलाईज्ड बँका, 24 खासगी बँका, 12 विदेशी बँकांसह ग्रामीण बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. जवळपास 10 लाख कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा अंदाज आहे. पेन्शनमध्ये 6 व्या पेन्शन आयोगाप्रमाणे वाढ व्हावी, पूर्ण महागाई भत्ता मिळावा आणि बँकांमधील रिक्त पदांवर भरती व्हावी अशा या बँक कर्मचार्‍यांच्या मागण्या आहेत.

close