आयसीआयसी बँकेला सापडला कॉस्ट कटिंगचा फॉर्म्युला

November 14, 2008 2:07 PM0 commentsViews: 4

14 नोव्हेंबर मुंबईआयसीआयसी बँकेलाही कॉस्ट कटिंग करण्याचा फॉर्म्युला सापडला आहे. या खाजगी बँकेनं त्यांच्या सर्व ब्रँचेसमध्ये कामाचे तास कमी केले आहेत.आयसीआयसी बँकेच्या कामाच्या वेळा यापूर्वी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत होत्या. मात्र येत्या एक डिसेंबरपासून त्यांच्या पाचशे ब्रँचेसमध्ये कामाचे तास सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा असतील, तर सुमारे दोनशे ब्रँचेसमध्ये सकाळी दहा ते चार अशी वेळ ठेवण्यात येईल. अर्थातच यामुळे वीजेची बचत तर होईलच आणि शिवाय कर्मचा-यांच्या कामाच्या तासातही घट होईल. ज्या शाखांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी गर्दी कमी असते तिथंच कामाचे तास कमी करण्यात आले आहेत. सध्यातरी कर्मचा-यांची कपात करण्याचा विचार नसल्याचं आयसीआयसी बँकेनं स्पष्ट केलं आहे.

close