नॅनो प्रकल्प महाराष्ट्रात हवा होता – राज ठाकरे

August 5, 2011 6:26 PM0 commentsViews: 3

05 ऑगस्ट

नॅनो प्रकल्प हा महाराष्ट्रातच हवा होता, तो महाराष्ट्रात आला नाही याचं आपल्याला दु:ख आहे. अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुजरातच्या नॅनो प्रकल्पाच्या दारात व्यक्त केली. आपल्या गुजरात दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी राज ठाकरे यांनी नॅनो प्रकल्पाला भेट दिली. तेंव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

त्याचबरोबर त्यांनी मोदी यांची पुन्हा एकदा स्तुती केली. ते म्हणाले की मोदी सी ई ओ सारखे काम करतात असं लोक म्हणतात, पण मी तर म्हणतो ते सी ई ओ नाहीत तर ते गुजरातचे विश्वस्त म्हणून काम करतात. गुजरात सरकार राबवत असेलल्या साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाचेही राज यांनी कौतुक केले. आणि हा प्रकल्प त्यांनी आपला गोदा पार्कला नजरेसमोर ठेऊन सुरू केला याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.

close