जमीन खचल्याने 2 मजली इमारत जमीनदोस्त

August 5, 2011 12:56 PM0 commentsViews: 1

05 ऑगस्ट

रत्नागिरी जिल्ह्यात भूस्खलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. दापोलीमधील गिमवणे गावात झालेल्या भूस्खलनात दोन मजली इमारत गाडली गेली. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना हे भूस्खलन झाले. इमारतीत काम करत असणार्‍या कामगारांपैकी 3 कामगारांनी आपला जीव वाचवला. पण अजूनही एक ते दोन कामगार जमिनीत गाडले गेले असल्याची शक्यता आहे. इमारतीचा तळमजला पूर्णपणे जमिनीत गेला असून जेसीबीच्या मदतीने तिथली माती बाजूला काढण्याचे काम वेगाने सुरु आहे.

close