शनिवार रात्रीपासून दूध विक्रेत्यांचे दूध बंद आंदोलन

August 5, 2011 1:19 PM0 commentsViews: 1

05 ऑगस्ट

कमिशन वाढवल नाही म्हणून शनिवारी रात्रीपासून दूध विक्रेते 24 तास दूध बंद आंदोलन करणार आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी दुधांचे दर वाढवण्यात आले. मात्र दूध विक्रेत्यांचे कमिशन वाढवले नाही. त्यामुळे दूध विक्रेते संघटनेनं दूध बंद आंदोलन पुकारले आहे. दूधाच्या किंमतीत बारा वेळा दरवाढ झाली पण दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाहीय याचा निषेध करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील तीन हजार दूध विक्रेते दूध विकणार नाही.

close