अण्णांच्या उपोषणाच्या दिनी डब्बेवालेही जाणार संपावर

August 5, 2011 4:28 PM0 commentsViews: 35

05 ऑगस्ट

लोकपाल विधेयकासाठी पुकारलेल्या आंदोलनात आता मुंबईतील डब्बेवालेही सहभागी होणार आहेत. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे उपोषण 16 ऑगस्टला सुरू होणार आहे. आणि त्याच दिवशी डब्बेवालेही संप करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. डब्बेवाल्यांच्या 120 वर्षांच्या इतिहासात संप करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबईची ओळख आणि मुंबईचाच एक भाग म्हणजेच मुंबईचा डब्बेवाला. अचूक व्यवस्थापन, प्रामाणिकपणा आणि सचोटी यामुळे मुंबईचा डब्बेवाला थेट लंडनच्या राजवाड्यात पोहचला होता. आता अण्णांच्या आंदोलना पाठिंबा दर्शवत 16 ऑगस्ट डब्बेवाले संपावर जाणार आहे. आज पर्यंतच्या कारकिर्दीत डब्बेवाल्यांनी कधी कोणता मोर्चा,संप, आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ आली नाही. पण आता पहिल्यांदा डब्बेवाल्यांच्या इतिहासात भ्रष्टाचाराच्या विरोधी लढ्यात सहभागी होण्याची नोंद लिहली जाणार आहे.

close