26/11 नंतरही काहीच धडा घेतला नाही : कॅग

August 5, 2011 5:04 PM0 commentsViews: 3

05 ऑगस्ट

सागरी सुरक्षेसंदर्भातही कॅगने आज अहवाल सादर केला. 26-11 च्या मुंबई हल्ल्यानंतरही काहीच धडा घेतला नाही असा ठपका अहवालात ठेवण्यात आला. सागरी सुरक्षेसाठी अतिशय जुनाट बोटींचा वापर होत असल्याचेही या अहवालात सांगितले आहे. मुंबई पोलीस आणि कोस्ट गार्ड यांच्याकडून सागरीसुरक्षेचा दावा किती फोल ठरला उघड झाले.

- गस्तीसाठीच्या 50 टक्के बोटी अतिशय जुन्या आहेत. त्यांना काढून टाकलं पाहिजे.- नवीन बोटींमध्येसुद्धा बंदुकी, रडार यासारखी महत्त्वाची उपकरणे नाहीत.- मुंबई हल्ल्यानंतर 14 नवीन पोलीस चौक्या बनवण्यात आल्या. त्यापैकी फक्त 5 कार्यरत आहेत – कोस्ट गार्डने सादर केलेल्या अनेक योजना सरकार दरबारी धुळखात पडल्या आहेत. त्यांना सरकारने अजून मंजुरी दिलेली नाही.

close