पुणे युथ गेम्समधला भ्रष्टाचार उघड

August 5, 2011 5:14 PM0 commentsViews: 2

05 ऑगस्ट

कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे सुरेश कलमाडींना आयोजन समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि आता पुण्यात 2008 साली युथ कॉमनवेल्थ गेम्समध्येही भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला. कामांचे कॉन्ट्रॅक्ट्स देताना अनेक गैरव्यवहार झाले. त्यामुळे कोट्यवधींचा तोटा झाला.

तसेच टेंडर न काढताच अनेक कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले, असं कॅगनं म्हटलंय. एवढंच नाही तर कॅगने विलासराव देशमुख यांच्यावरही ताशेरे ओढलेत. युथ कॉमनवेल्थमध्ये सार्वजनिक वापराच्या जागेवर थ्री स्टार हॉटेल उभारले गेले. असं कॅगच्या अहवालात उघड झाले. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच परवानगी दिली होती, असं कॅगच्या अहवालात म्हटले आहे.

त्यामुळे आता कलमाडी यांच्यासोबत विलासराव देशमुखही अडचणीत आलेत. पुण्यात झालेले युथ गेम्स हे नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्सची रंगीत तालीम होती. पण तिथे ज्या चुका आयोजन समितीने केल्या, त्यातून कोणताच धडा घेतला नाही आणि त्यामुळेच दिल्लीच्या कॉमनवेल्थ गेम्सचा खेळखंडोबा झाला.

युथ कॉमनवेल्थमध्ये भ्रष्टाचार

- कॅगच्या अहवालात कलमाडींवर ठपका- ज्या जागेवर थ्री स्टार हॉटेल्स उभारले गेले, ती जागा सार्वजनिक वापराची होती- शाळा किंवा कॉलेजांसाठी ही जागा आरक्षित होती – जागेच्या व्यावसायिक वापराची परवानगी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी दिली – बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे या कंपनीला 31 कोटी 15 लाखांचं कॉन्ट्रक्ट दिलं – टेंडरशिवायच हे कॉन्ट्रक्ट देण्यात आलं – शशी प्रभू अँड असोसिएट्स मुंबई यांना ऑगस्ट 2006 मध्ये कन्सल्टंट म्हणून नेमलं – या कंपनीला 6 कोटी 74 लाखांऐवजी 11 कोटी 28 लाख रुपये दिले – कचराकुंड्यांचे 1 कोटी 9 लाखांचे कॉन्ट्रॅक्ट व्हाईट क्रो. पुणे या कंपनीला अनियमितपणे देण्यात आले- कचराकुंडीचे टेंडर खूप कमी कालावधीत काढले- त्यामुळे टेंडर भरण्याची संधी इतर कंपन्यांना मिळाली नाही

दरम्यान, कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटक होण्यापूर्वी कलमाडी यांनी आयबीएन-लोकमतशी खास बातचीत केली होती. त्यावेळी त्यांनी पुणे युथ कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नव्हता, असा दावा केला होता.

close