अहमदाबाद स्टेडिअम सगळ्यात खराब !

August 5, 2011 6:06 PM0 commentsViews: 5

05 ऑगस्ट

अहमदाबाद येथील सरदार पटेल क्रिकेट स्टेडिअम हे वर्ल्डकप स्पर्धेतील सगळ्यात खराब स्टेडिअम असल्याचे आयसीसीच्या अहवालात म्हटले आहे. देशातल्या आठ स्टेडिअमवर आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मोटेरा स्टेडिअमची अवस्था खराब असल्याचे या अहवालात म्हटले आहे. स्टेडिअमवरच्या गेस्ट बॉक्सची व्यवस्था खालच्या दर्जाची होती तसेच त्याचं छतसुद्धा तुटलेल्या अवस्थेत होतं. बसण्याच्या ठिकाणीही अस्वच्छता होती असे ताशेरेही अहवालात मारण्यात आले आहेत. स्टेडिअमच्या या अवस्थेला गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप माजी अध्यक्ष नरहरी अमिन यांनी केला.

close