वैद्यकीय प्रवेश परीक्षा आता राष्ट्रीय स्तरावर होणार

August 6, 2011 11:55 AM0 commentsViews: 7

06 ऑगस्ट

वैद्यकीय अभ्यसक्रमाच्या प्रवेशासाठी 2012 -13 पासुन राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच एमसीआयने घेतला आहे. यासाठी या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम एमसीआयने वेबसाईटवर प्रसिद्ध केला. 11 ऑगस्ट पर्यंत यावरचे आक्षेप एमसीआयने देशभरातून मागवली.

परंतू महाराष्ट्राचा एसएससी बोर्डाचा अकरावी बारावीचा सायन्सचा अभ्यासक्रम आणि एससीआयने दिलेले आभ्यसक्रम यामध्ये मोठ्याप्रमाणात फरक आहे. विद्यार्थी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रम कसा शिकतील. असा पेच पालक आणि विद्यर्थ्यांपुढे पडला.

दरम्यान महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय अभ्यसक्रमाच्या 4,400 जागा राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. नॅशनल एलिजीबीलीटी एन्टर्स्न टेस्ट म्हणजेच नेट च्या परिक्षेनंतर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा कोटा कमी होणार नाही. असा विश्वास महाराष्ट्र सरकारने दिला. पण शिवसेनेचे आमदार डॉक्टर दिपक सावंत यांनी नेटला विरोध केला आहे.

close