रेणके अहवालाबाबत पंतप्रधानांना पत्र लिहणार – रेणके

November 14, 2008 12:05 PM0 commentsViews: 4

14 नोव्हेंबर पुणेरेणके आयोगाच्या अहवालावर लक्ष्मण मानेंनी सुरू केलेल्या अपप्रचाराला, या आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके पंतप्रधानांना पत्र लिहून विचारणा करणार आहेत. हा अहवाल कॅबिनेटपुढं येण्यापूर्वीच लक्ष्मण मानेंना कसा उपलब्ध झाला, असा सवालही रेणके यांनी उपस्थित केला आहे. हा अहवाल शरद पवारांनी लक्ष्मण मानेंना दिला का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. राजकीय इच्छाशक्ती असल्यास भटक्या विमुक्त जमातींमध्ये सुधारणा घडून येऊ शकते, असंही रेणके म्हणाले. अहवालातल्या अनेक विधानांचा विपर्यास केल्याचंही रेणके म्हणाले.पुणे येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

close