वन डेसाठी ‘द वॉल’चे ‘कम बॅक'; हरभजन,युवराज बाहेर

August 6, 2011 9:28 AM0 commentsViews: 4

06 ऑगस्ट

इंग्लंड विरुद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय टीम नुकतीच जाहीर झाली. टेस्टमध्ये खेळलेले हरभजन सिंग आणि युवराज सिंग या टीममध्ये नाहीत. तर राहुल द्रविडने दोन वर्षांनंतर वन डेमध्ये पुनरागमन केलं आहे. पाच वन डे आणि एक टी-20 मॅचसाठी ही सोळा जणांची टीम निवडण्यात आली.

हरभजनला वगळताना निवड समितीने कारण दिलंय ते त्याच्या खराब फॉर्मचं. तर युवराजला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली. वीरेंद्र सेहवाग या टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. बॅटिंगमध्ये फारसे अनपेक्षित निर्णय नाहीत. पण नाही म्हणायला बॉलिंगमध्ये श्रीसंत ऐवजी विनय कुमारला संधी देण्यात आली.

अशी असेल टीम..

महेंद्र सिंग धोणी, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सुरेश रैना, रोहीत शर्मा, झहीर खान, आर अश्विन, प्रवीण कुमार, मुनाफ पटेल, ईशांत शर्मा, आर विनय कुमार,अमित मिश्रा, पार्थिव पटेल'द वॉल'चा समावेश

38 वर्षांच्या राहुल द्रविडच्या समावेशामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे. पण मैदानावर टिकून राहण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे निवड समितीने त्याचा विचार केला. दोन वर्षांनंतर द्रविड वन डे टीममध्ये परतला. यापूर्वी शेवटची वन डे तो खेळला होता दोन वर्षांपूर्वी. 30 सप्टेंबर 2009मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट इंडीजविरुद्ध तो खेळला होता. द्रविड भारतातर्फे 339 वन डे खेळला. आणि यात त्याने 39 रनच्या ऍव्हरेजने 10 हजार 765 रन केले आहेत. त्याचा हायएस्ट स्कोअर 153 रन्सचा आहे. आणि बारा सेंच्युरी तसेच 82 हाफ सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत.

close