खड्डे अवतरले फेसबुकवर !

August 6, 2011 1:07 PM0 commentsViews: 8

काजल अय्यरसह, मुंबई.

06 ऑगस्ट

आता मुंबईच्या खड्डयांना फेसबुकवरही जागा मिळाली आहे. फेसबुकवर ह्या खड्डयांसाठी एक पेजच तयार करण्यात आलं आहे. सततच्या या खड्‌ड्यांमुळे मुंबईकरांना होण्यार्‍या त्रासाची जाणीव पालिकेला व्हावी याचसाठी हा प्रयत्न करण्यात आला.

दररोज अनेक कटकटींना हसतमुखाने तोंड देण्यार्‍या मुंबईकरांना पावसाळ्यात आणखी एका त्रासाला सामोरं जावं लागतं आणि ते म्हणजे रस्त्यांवरचे खड्डे. या त्रासाला पार वैतागून गेलेल्या मुंबईकरांनी आता आपली व्यथा फेसबुकवर मांडली.

खड्डयांमुळे बिघडलेली वाहने दुरुस्त करण्यासाठी होणार्‍या खर्चांची बिलं या हुश्शार मुंबईकरांनी थेट फेसबुकवरुन महापालिका आयुक्तांनाच पाठवली. हे पेज तयार केले आहे दिलीप मुरकोट यांनी. आतापर्यंत ह्या पेजवर हजार मुंबईकरांनी खड्डयांचे फोटोआणि बिलं पाठवली आहेत.

केवळ सामान्य मुंबईकरांकडूनच नाही तर राजकारण्यांकडूनही महापालिकेला थेट घरचा आहेर मिळतोय. पावसाळी अधिवेशन चालू असतानाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही अधिवेशनात हा विषय घेतला गेला. याबाबत मुंबईचे पालकमंत्री नसीम खान म्हणतात, आम्ही महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. तसेच पालिकेने कंत्राटदारांवर कडक कारवाई केली पाहिजे.

दरम्यान आता पालिका प्रशासनाला तोंड द्यावे लागतंय ते खड्डयांसंदर्भात कंत्राटदारांना दिल्या गेलेल्या 500 कोंटीच्या टेंडरविषयीचं.आणि त्यामुळे निव्वळ 40 कोटी रुपये हे खड्डे बुजवण्यासाठी खर्च झाले. यंदा पालिकेने कंत्राटदारांना 24 लाख रुपये दंड केला आहे. पण नवीन तंत्रज्ञानावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही खड्डे मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. त्यातून सुटका कधी होणार हाच त्यांचा प्रश्न आहे.

close