अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेणं ही चूक झाली !

August 6, 2011 10:24 AM0 commentsViews: 4

06 ऑगस्ट

आदर्श घोटाळ्या प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेणं ही काँग्रेसची चूक होती असं काँग्रेसला आता वाटत आहे. आज सकाळी काँग्रेस कोअर कमेटीच्या झालेल्या बैठकीत हा विचार पुढे आल्याचं सुत्रांनी सांगितलं. चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे चुकीचा संकेत गेलं. आता ती चूक पुन्हा करायची नाही असंही काँग्रेस नेत्यांनी ठरवलं आहे. भाजपने येडियुरप्पांवर आरोप झाल्यावर त्यांचा राजीनामा घेतला नाही. शेवटी लोकायुक्तांच्या अहवालात त्यांचे नाव आल्यावर त्यांचा राजीनामा घेतला गेला. कॅगच्या अहवालात थेट शीला दीक्षितांवर ठपका नाही त्यामुळे विरोधकांच्या दबावापुढे झुकायचे नाही असं काँग्रेसने ठरवले आहे.

close