‘रॅक’ जहाजाच्या कॅप्टन, इंजिनियरला अटक आणि जामीन

August 6, 2011 1:18 PM0 commentsViews: 3

06 ऑगस्ट

गुरूवारी मुंबई जवळच्या समुद्रात बुडालेल्या एम व्ही रॅक या मालवाहू जहाजाच्या कॅप्टन आणि चीफ इंजिनियरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना डीजी शिंपिंगच्या कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांची 25 हजार रुपयांच्या जामीनावर सोडण्यात आलं.

मुंबईपासुन 45 किलोमीटर अंतरावर एम व्ही रॅक हे मालवाहू जहाज त्याच्यावर असलेल्या 60 मेट्रीक टन कोळसा आणि 290 टन तेल साठ्यासह बुडाले. त्यामुळे समुद्रातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला. त्याच बरोबर एम व्ही रॅक ज्या ठिकाणी बुडाले आहे.

ती जागा मुंबई बंदरात येण्या जाण्याच्या मार्गावरची आहे. त्यामुळे दुसर्‍या जहाजांना या बुडालेल्या जहाजामुळे धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे आज एम व्ही रॅक जहाजाचा कॅप्टन आणि चीफ इंजिनियर, यांच्यावर निश्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

close