..तरच सरकारशी चर्चा – अण्णा हजारे

August 6, 2011 1:28 PM0 commentsViews: 5

06 ऑगस्ट

नागरी समितीचे काही मुद्दे सरकारने मान्य केले तर पंतप्रधान पदासह इतर गोष्टींवर चर्चा होऊ शकते असं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारापासुन सर्वसामान्यांची मुक्तता होण्यासाठी देशाला प्रभावी लोकपाल मिळायला हवा असा आपला आग्रह असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बाबा रामदेव यांना आपला पाठिंबा आहे.

पण आपण एकाच व्यासपीठावर येणार नाही असंही अण्णांनी स्पष्ट केलं. उपोषण सार्वजनिक ठिकाणीच करणार असं सांगत वरुण गांधीचं निमंत्रण त्यांनी फेटाळले. अण्णा आज जळगावमध्ये होते. शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांनी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. त्याच्या सुनावणीसाठी अण्णा जळगावच्या कोर्टात आले होते.

close