जागतिक मंदीचा परिणाम फर्निचर रिटेलवरही

November 14, 2008 1:09 PM0 commentsViews: 28

14 नोव्हेंबर मुंबईअश्विन कुमार घर खरेदी केल्यानंतर पहिल्यांदा घर सजवणं ही प्राथमिक जबाबदारी असते. पण सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आहे. आणि त्याचा परिणाम फर्निचर रिटेलवरही दिसतोय. दरवर्षी दिवाळीच्या दिवसांत फर्निचर रिटेल क्षेत्रात तीस ते चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त धंदा होतो. मंदीमुळे यंदाचं वर्ष या क्षेत्राला खराब गेलयं. त्यामुळं प्रॉपर्टी क्षेत्रात पुन्हा तेजीचे दिवस येतील अशी आशा आहे. घरातलं आकर्षक फर्निचर घराची शोभा वाढवतं.पण रिअल इस्टेटमधल्या मंदीचा परिणाम इथंही दिसतोय. लोकं सध्या घर खरेदीसाठी वेट अ‍ॅन्ड वॉचच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळं घराची सजावट करणंही दूर पडलंय. ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन बड्या कंपन्यांनीसुद्धा फर्निचर रिटेलच्या विस्ताराची योजना सध्या लांबणीवर टाकली आहे. फ्यूचर ग्रुपची यावर्षी सहा टाऊनशिप बांधण्याची योजना होती .पण मंदीमुळे दीड लाख स्वेअर फूटच्या स्टोअरची जागा कमी करून फक्त एक लाख स्वेअर फूट करण्यात आली आहे. नीलकमल ग्रुपच्या एटहोम या फर्निचर स्टोअरमध्ये दिवाळीत पंचवीस टक्के विक्री कमी झाली. त्याशिवाय त्यांची नवं स्टोअर उघडण्याची योजनाही तीन ते चार महिन्यांसाठी बारगळलीय. फर्निचर रिटेल कंपन्याना आता रिअल इस्टेस्ट क्षेत्रातली मंदी लवकरात लवकर संपावी अशी आशा आहे. कारण त्यानंतरच मार्केटमधली फर्निचर्सची विक्री वाढेल.

close