कॉमनवेल्थ प्रकरणी शीला दीक्षित यांची काँग्रेसकडून पाठराखण

August 6, 2011 11:04 AM0 commentsViews: 6

06 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्सवर आलेल्या कॅगच्या रिपोर्टवर आज सकाळी काँग्रेस कोअर कमिटीने चर्चा केली. त्यात शीला दीक्षित यांच्यावर कारवाई करायची नाही असा निर्णय झाल्याचं समजतं. कॅगच्या रिपोर्टमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, 3 मंत्री , पंतप्रधान कार्यालय आणि सुरेश कलमाडी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.

त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र काँग्रेस पक्षाने शीला दीक्षित यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. कोअर कमिटीची ही बैठक सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत आज 7 रेसकोर्स या ठिकाणी पार पडली. सोनिया गांधी यांच्यावर सध्या न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत.

close