धारावीत नाल्यावरचा पूल खचला ; वाहतूक विस्कळीत

August 6, 2011 2:25 PM0 commentsViews: 5

06 ऑगस्ट

मुंबईत धारावीतील टी जंक्शन सिग्नलजवळच्या पुलाची एक बाजू आज सकाळी 11 च्या सुमारास कोसळली. या ब्रीजची डागडुजी करण्यात न आल्याने हा अपघात घडला. घटना घडली तेव्हा त्यावेळी ब्रीजवरती एक डम्पर आणि टेम्पो सिग्नल लागल्यामुळे थांबले होते. हा ब्रीज 35 वर्षं जुना आहे. यात अडकलेला डम्पर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे माहिमकडून धारावीला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

close