ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचा गौरव

August 6, 2011 3:24 PM0 commentsViews: 9

06 ऑगस्ट

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना राज्य सरकारचा यंदाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रणदिवे यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1942 च्या चले जावच्या लढ्यात सहभागी झालेल्या दिनू रणदिवे यांनी मराठी पत्रकारितेमध्ये आपला एक आदर्श निर्माण केला.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिनू रणदिवे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच आयुष्यभर निर्भिड पत्रकारिता केली. तळागाळातल्या लोकांना न्याय देणार्‍या बातम्या या दिनू रणदिवे हा त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य गाभा होता. अशाच शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दिनू रणदिवे यांचा गौरव केला. या प्रसंगी गिरणी कामगार देशोधडीला लागले. आता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी गिरणी कामगारांना घरं देऊन त्यांना आधार द्यायला हवा असं आवाहन दिनू रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

close