‘आरक्षण’ ची पोस्टर्स फाडून निषेध

August 6, 2011 4:18 PM0 commentsViews: 6

06 ऑगस्ट

प्रकाश झा यांच्या आरक्षण चित्रपटाला विरोध सुरूच आहे. रिपाई कार्यकर्त्यांनी अंधेरी इथल्या प्रकाश झा यांच्या कार्यालयापुढे निर्देशनं केली. या चित्रपटात आरक्षणाविषयी दिशाभूल केली असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी रिपाईच्या 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी माहिम परिसरात आरक्षण चित्रपटाची पोस्टर्स फाडली. पोस्टर्सला काळ फासण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनामुळे काही काळ माहिम कॉजवेजवळची वाहतूक विस्कळीत झाली होती.

close