विद्यार्थ्यांनी केली झाडांशी दोस्ती !

August 6, 2011 4:45 PM0 commentsViews: 3

06 ऑगस्ट

ठाण्यातल्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या तरुणांनी आज अनोखा फ्रेंडशिप डे साजरा केला. तरुणांनी चक्क झाडालाच फ्रेंडशिप बँन्ड बांधून सेलिब्रेशन केले. या वेळी तरुणांनी शपथ घेऊन झाडांचे संवर्धन करण्याचा निश्चय केला. जोशी बेडेकर महाविद्यालयात तरुणांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँन्ड बांधले पण त्याचबरोबर त्यांच्या कॅम्पसमधील झाडांनाही त्यांनी फ्रेंडशिप बँन्ड बांधले. जागतिक मैत्री दिवस साजरा करतानाच वृक्षसंवर्धनही करणे महत्वाचे आहे असं मत या तरुणांनी व्यक्त केले.

close