द्रविडची वन डेतून निवृत्ती !

August 6, 2011 6:15 PM0 commentsViews: 4

06 ऑगस्ट

इंग्लंड विरुद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय टीम मध्ये तब्बल दोन वर्षानंतर राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला. वन डे मध्ये राहुलच्या समावेशाने सगळ्यांच्या भुवय्या उंचावल्या. मात्र आपल्या खंबीर खेळीमुळे 'द वॉल' हा मान प्राप्त झालेल्या राहुलने वन डे आणि टी – 20 मॅच मधून निवृत्ती घोषित केली आहे. इंग्लंड सिरिजनंतर राहुल निवृत्ती घेणार आहे. पण कसोटी सामन्यात आपण खेळणार आहोत असं ही राहुलने स्पष्ट केलं.

38 वर्षांच्या राहुल द्रविडने मैदानावर टिकून राहण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे तो आजवर ओळखला गेला. इंग्लंड दौर्‍यावरच राहुल द्रविडनेएक माईलस्टोन सेंच्युरी ठोकली. या सेंच्युरीमुळे आता सुनील गावसकर आणि ब्रायन लाराच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. राहुल द्रविडने दुसर्‍या टेस्टमध्ये आपली 34 वी सेंच्युरी ठोकलीय ती 155व्या टेस्ट मॅचमध्ये.

साडेबारा हजारांहून जास्त रन त्याने केले आहे. आणि ऍव्हरेजही 52.76 असं हेल्दी आहे. 34 सेंच्युरीबरोबरच 60 हाफ सेंच्युरीही त्याने ठोकल्यात. त्याचा हायएस्ट स्कोअर आहे 270 रनचा. तो ही पाकिस्तानविरुध्दचा. सुनील गावसकर 34 सेंच्युरीसाठी 125 टेस्ट मॅच खेळले.

त्यांचा ऍव्हेरज होतं 50 रनचा. आणि एकूण रन त्यांनी केले 10 हजार एकशे 22. यात 45 हाफ सेंच्युरीही होत्या. त्यांचा हायएस्ट स्कोअर होता 236 रन नॉटआऊट . तर वेस्ट इंडीजचा डावखुरा बॅट्समन ब्रायन लारा मोठ्या इनिंग खेळण्यात माहीर होता. टेस्टमध्ये 400 रन करण्याचा रेकॉर्ड त्याने केला. आणि एकूण 131 टेस्टमध्ये अकरा हजार नऊशे त्रेपन्न रन केले. त्याचे ऍव्हरेज 52 रनचं होतं. आणि 400 रन हा त्याचा हायएस्ट स्कोअर ठरला.

close