..तरच पंतप्रधानांच्या मुद्द्यावर पुनर्विचार – अण्णा हजारे

August 7, 2011 11:03 AM0 commentsViews: 2

07 ऑगस्ट

नागरी समितीच्या इतर मागण्या मान्य केल्या तर पंतप्रधानांना लोकपालच्या कक्षेत आणण्याच्या मुद्द्यावर पुनर्विचार करता येऊ शकतो असे संकेत अण्णांनी दिले. आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत अण्णांना सांगितले. पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत यावेत या मागणीवर आम्ही सरकारशी चर्चेला तयार आहोत.

पंतप्रधानांच्या मुद्द्यावर आम्ही जनतेच्या व्यापक हितासाठी पुनर्विचार करू शकतो असे संकेत देत अण्णांनी पुन्हा सरकारशी तडजोडीचा मुद्दा खुला ठेवला. तसेच 16 ऑगस्टपासून जंतरमंतरवर उपोषण करण्याच्या विचारावर आम्ही ठाम आहोत. या आंदोलनात सरकार अडथळे आणू शकते. मात्र अजूनही आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे कोणतही लेखी पत्र आम्हाला मिळालेले नाही. त्यामुळे सध्या तरी आम्ही जंतरमंतरवर उपोषण करण्याच्या मुद्द्यावर आपण ठाम आहोत असं अण्णा हजारे यांनी सांगितले.

close