पूनम महाजन लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील

November 14, 2008 12:22 PM0 commentsViews: 85

14 नोव्हेंबर मुंबईविनोद तळेकर लोकसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षात सुरू झालीये. सध्यातरी भाजपनं यात आघाडी घेतलेली दिसतं आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी आपआपल्या पक्षात जोरदार मोर्चेबांधणी केली. दक्षिण मुंबईतून भाजपाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या पूनम महाजनसुद्धा चर्चेत आहेत, ते त्यांच्या होर्डिंग कॅम्पेनमुळं. भाजप युवा मोर्च्याच्या महामंत्री पूनम महाजन यांचे होर्डिंग सध्या मुंबईत सर्वत्र झळकत आहेत. ही होर्डिंग आहेत भाजप युवा मोर्च्याच्या मतदार अभियानाची पण त्यावर असलेली पूनम महाजन यांची छबी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. लोकसभा निवडणुकांची ही तयारी असल्याचं बोललं जातंय. या होर्डिंगवरचा मजकूरही लक्ष वेधून घेणारा आहे. यात बदलही घडू शकतो, असं आवाहन करण्यात आलंय. हाच मुद्दा अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकीतही चर्चेत होता.प्रमोद महाजन यांच्यानंतर पूनम सक्रिय राजकारणात उतरणार याचे हे स्पष्ट संकेत मानले जातात. दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहे. मतदार संघ फेररचनेत दोन मतदार संघाचा मिळून दक्षिण मुंबई हा एक मतदारसंघ झालाय शिवसेनेचे मोहन रावले यापैकी एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतआहेत .तर दुस-या मतदार संघातून भाजपच्या जयवंतीबेन मेहता पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे दोन्ही मतदारसंघाचा एक मतदारसंघ झाल्यानं ही जागा कोणी लढवायची, या मुद्यावर सेना भाजपमध्ये चुरस आहे. तर भाजपला ही जागा मिळाल्यास, भाजपमध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच होणार हे मात्र निश्चित.

close