कॉमनवेल्थ प्रकरणी शीला दीक्षित यांचा पुतळा जाळून निषेध

August 7, 2011 10:58 AM0 commentsViews: 5

07 ऑगस्ट

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा आज पुतळा जाळून निषेध केला. यापूर्वीच भाजपने कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी शीला दीक्षित यांच्या राजीनाम्याची मागणी केली. येडियुरप्पा यांचा राजीनामा घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. शूंगलू समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कॅग रिपोर्टमध्ये दोषी आढळल्यास कोणालाही अभय दिलं जाणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. मात्र आता पंतप्रधान आणि काँग्रेसच शीला दीक्षित यांना पाठिशी घालतायत हा विरोधाभास का असा सवाल भाजपचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपस्थित केला.

close