दूध विक्रेत्यांचा कडकडीत संप

August 7, 2011 11:10 AM0 commentsViews: 1

07 ऑगस्ट

ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत दूध विक्रेत्यांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. या संपामुळे अनेकांना आज कोराच चहा प्यायची वेळ आली. या संपात एकूण 3000 दूधविक्रेते सहभागी झाले आहेत. तर संप मोडण्यासाठी दूध विक्री करणार्‍या विक्रेत्यांचे दूध ओतून टाकण्याचा प्रकार आज ठाण्यात पाचपाखाडी इथं घडला. दूध विक्री करणार्‍यांचे दूध सक्तीने ओतण्यात आले. आनंद नगर टोल नाक्यावर दूधाने भरलेल्या गाड्याही परत पाठवण्यात आल्या. आज संपामुळे 22 लाख रूपयांच्या दूधाची विक्री झाली नाही. याचा फटका मात्र सामान्य ग्राहकांना बसला.

close