रॅकची तेलगळती पोहचली रायगडच्या किनार्‍यावर

August 8, 2011 11:06 AM0 commentsViews: 6

08 ऑगस्ट

मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर एम व्ही रॅक जहाजाने जलसमाधी घेतलेल्या जहाजातला साठ हजार मेट्रीक टन कोळसा, 290 टन इंधन तेल आणि 50 टन डिझेल मुंबईच्या समुद्रकिनार्‍यासह आता रायगडचा किनार्‍यावर पसरत आहे. रायगड समुद्रकिनार्‍यावर अलिबाग आवास येथे तेलाचे तवंग पोहचले आहे.

साठ हजार मेट्रीक टन कोळसा, 290 टन इंधन तेल आणि 50 टन डिझेलसह मुंबईच्या समुद्रकिनारी बुडालेल्या एम व्ही रॅकमधून सुरू झाली आहे. रविवारी सकाळपासून तेलाचे तवंगांमुळे जुहू किनारा काळवंडला आहे. तासाला दिड ते दोन टन इंधन या वेगाने तेलगळती होत असून मुंबईच्या किनार्‍यासह आता रायगडचा किनारा ही यात ओढावला गेला आहे. तेलाच्या तवंगामुळे काळा झालेला कचरा जेसीबीनं काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनाकडून किनार्‍याची पाहणी केली जात आहे.

close