महात्मा गांधींच्या जन्मगावी भेट देऊन राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली

August 7, 2011 11:21 AM0 commentsViews: 4

07 ऑगस्ट

राज ठाकरे यांनी शनिवारी दुपारी महात्मा गांधी यांच्या पोरबंदर या जन्मगावी असलेल्या किर्ती मंदिराला भेट दिली. 20 खोल्या असलेल्या या भव्य वाड्यात महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. या वाड्यातील त्यांची अभ्यासिका आणि संग्रहालयाला भेट दिली.

हे ठिकाण असो किंवा शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला या वंदनीय वास्तू असल्याचे राज यांनी सांगितले. गांधीजींपासून नेहमीच प्रेरणा मिळते असं सांगत त्यांनी लंडनहून आणलेल्या गांधीजींच्या एका फोटोबायोग्राफीचं उदाहरण दिलं.

त्या पुस्तकावरुन प्रेरणा घेऊन आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फोटोबायोग्राफी तयार केली असल्याची माहिती त्यंानी दिली. मंुबईला गेल्यानंतर हे पुस्तक आपण किर्ती मंदिराला पाठवून देऊ असं आश्वासन त्यांनी या मंदिराचे विश्वस्त राकेश शहा यांना दिलं.

close