गळती झालेले तेल वापरात येऊ शकते बालवैज्ञानिकाचा दावा

August 8, 2011 11:28 AM0 commentsViews: 6

08 ऑगस्ट

मुंबईतील समुद्रात जहाजातून सुरू असलेल्या तेलगळतीवर, चांदवडच्या एका बालवैज्ञानिकाने उत्तर शोधले आहे. मयूर शेलार या बालवैज्ञानिकाने यावर उत्तर शोधून तेलाचा तवंग वायपरने गोळा करण्याचा पर्याय शोधला आहे. तेलगळती झालेल्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी बुम्स पद्धत वापरली जाते.

पण या पद्धतीत, त्या तेलाचा पुन:वापर करता येत नाही. मयुर म्हणतो, तेलाच्या तवंगाचे रुपांतर घनपदार्थात होतं. त्यानंतर हा घनपदार्थ पाण्यात न मिसळता समुद्राच्या तळाशी पोहोचतो. पुढे तो बाहेर काढून ट्रीपल फ्लिटर केलेलं तेल पुन्हा वापरता येतं. त्यामुळे समुद्राचे प्रदूषण रोखता येईल आणि तेलही वाया जाणार नाही असा मयूरचा दावा आहे. मयूर शेलारच्या, या प्रयोगाला पहिल्या क्रमांकाचा एम्पायर अवॉर्ड मिळाला आहे.

close