झहीर खान मालिकेतून बाहेर

August 7, 2011 11:29 AM0 commentsViews: 4

07 ऑगस्टइंग्लंडमध्ये दुखापतींनी भारतीय टीमचा पिच्छा पुरवला. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे झहीर खान उरलेल्या सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. पहिल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये झहीरला ही दुखापत झाली. आणि पहिल्याच दिवशी त्याने मैदान सोडले. त्यानंतर दुसर्‍या टेस्टमध्येही तो खेळू शकला नाही. तर नॉर्दम्पटनशायर विरुद्धच्या सराव मॅचमध्येही त्याने फक्त तीन ओव्हर टाकल्या. आणि पुढे तो बॉलिंग करु शकला नाही. अखेर आज बीसीसीआयनेच झहीरला दुखापत झाल्याचे स्पष्ट केले. त्याच्या दुखर्‍या पायावर शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यामुळे पुढचे चार महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाही. झहीर ऐवजी आता रुद्रप्रताप सिंग टीममध्ये सामील होईल.

close