बालकलाकारांची घट्ट मैत्री ; ‘आय एम कलाम’साठी आले एकत्र

August 7, 2011 12:20 PM0 commentsViews: 5

भाग्यश्री वंजारी, मुंबई

07 ऑगस्ट

बॉलीवूडमध्ये निखळ मैत्री तशी कमीच पाहायला मिळते. अनेकदा सिनेमांच्या माध्यमातून स्टार्स जवळ येतात आणि मग दूर जातात. पण आता स्वतःचा सिनेमा नसतानाही फक्त मैत्रीसाठी प्रमोशन करण्याचा नवा ट्रेंड बॉलीवूडमध्ये सुरु होतोय. आणि ट्रेंडसुरु केलाय बॉलीवूडच्या आघाडीच्या बालकलाकारांनी.

बालकलाकार दर्शिल सफारी आणि स्टॅनली का डब्बा फेम पार्थो गुप्ते सध्या बिझी आहेत एका बालकलाकाराला म्हणजेच हर्ष मायरला सपोर्ट करण्यात. हर्ष मायर म्हणजे आय एम कलाम या सिनेमातला छोटू. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अशा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये हे तीनही बालकलाकार व्यस्त आहेत.

आय एम कलामच्या प्रमोशनसाठी हर्षने स्वतःच या दोघांशी संवाद साधला आणि सिनेमाचा मूळ उद्देश लोकांपर्यंत पोहचावा यासाठी दर्शिल आणि स्टॅनलीला आवाहनही केलं. बालमजूरीला विरोध आणि शिक्षणाचा प्रचार सारख्या जागतिक विषयावर हा सिनेमा आधारला आहे.

छोटू या अत्यंत गरीब मुलाची धडपड या सिनेमातनं दाखवण्यात आली. अत्यंत गरिबीतही कधीच हार न मानण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे छोटू आपले आयुष्य कसे घडवतो. रस्त्याजवळच्या एका ढाब्यात काम करणारा हा छोटू टीव्हीवर ए पी जे अब्दुल कलाम यांना पाहतो आणि त्यांच्यासारखे बनण्याचे ठरवतोही.

प्रत्यक्ष आयुष्यातही हर्ष एका गरीब कुटुंबातच वाढला. असं असतानाही अभिनयासारखे मोठं स्वप्न त्यान पाहील आणि राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजलही मारली. अशा या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकाराला सपोर्ट करण्यासाठी बॉलीवूडमधले हे आघाडीचे बालकलाकार येणार नाहीत तरच नवल.

दिल्लीतल्याच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये हे तीनही कलाकार ज्या प्रकारे एकमेकांमध्ये मिसळले होते ते पाहीलं तर बॉलीवूडमध्ये आता स्टार्सनी स्वतःचा सिनेमा नसतानाही सपोर्ट करण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला असं मानायला हरकत नाही.

close