बंधार्‍याची भिंत खचल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया

August 8, 2011 11:49 AM0 commentsViews: 8

08 ऑगस्ट

वर्धा जिल्हातील सेलु तालुक्यात बंधार्‍याच्या भिंतीचा काही भाग खचल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.सेलु तालुक्यात कोटंबा इथं 1 कोटी 20 लाख रुपये खर्चून 21 वषांर्पूर्वी हा बंधारा बांधण्यात आला होता. बोर नदीवरील या बंधार्‍यांमुळे आजूबाजूच्या शेतकर्‍यांना सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याची सोय झाली होती. गेल्या वर्षी या बंधार्‍याला भगदाड पडली होती. मात्र तरीही प्रशासनाने लक्ष दिले नाही. भिंतीचा काही भाग खचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे.

close