चंद्रपूरमध्ये हत्तीरोगाच प्रमाण वाढतंय

November 14, 2008 12:30 PM0 commentsViews: 19

12 नोव्हेंबर चंद्रपूरनम्रता शास्त्रकार चंद्रपूरमध्ये हत्तीपायाच्या रोगानं उच्चांक गाठलाय. आरोग्य विभागानं हत्तीरोग निर्मूलन मोहिम राबवली तरीही या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. यावर्षी तर हत्तीरोगाच्या रुग्णांचा आकडा सव्वीस हजाराच्या वर गेलाय. या रोगामुळे त्यांना काहीच काम करता येत नाही. अनेक उपचार करूनही त्याचा काहीच फायदा झाला नाही, असं अनेक रुग्णांचं मत आहे. या भागात झुडपी जंगल असल्यानं डासांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मूल सावली,ब्रम्हपुरी,चिमूर या भागांत हत्तीरोग मोठ्या प्रमाणावर आहे. आरोग्य विभाग अनेक वर्षापासून हत्तीपाय निर्मूलनावर कोट्यवधींचा खर्च करतं. तरीही यावर्षी म्हणजे 2008 मध्ये रुग्णांचा आकडा 26 हजार 240 वर जावून पोहचलाय. 2004 मध्ये जिल्ह्यात हत्तीरोगाचे 11 हजार 865 रुग्ण होते. 2005 मध्ये हा आकडा 21 हजार 788 वर पोहचला. 2006 मध्ये रुग्णांची संख्या होती. या हत्तीरोगाचं निर्मूलन दूरच पण त्याचा प्रसार कसा कमी करायचा याचं आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

close