प्रवीण कुमार भडकला चाहत्यांवर

August 8, 2011 11:54 AM0 commentsViews: 1

08 ऑगस्ट

भारताचा फास्ट बॉलर प्रवीण कुमारने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. नॉर्दम्पटनशायर विरुद्धच्या प्रॅक्टिस मॅचनंतर फॅन्सबरोबर त्याचे मोठं भांडण झालं. शनिवारी मॅच संपल्यावर हा प्रकार घडला. भारतीय टीम बसमध्ये बसून हॉटेलवर परतत होती. तेव्हा काही फॅन्सनी टीमची हुर्यो उडवली. प्रवीण कुमारवरही त्यांनी शेरेबाजी केली. त्यामुळे भडकलेल्या प्रवीणने फॅन्सशी वाद घातला. अखेर सुरक्षा रक्षकांना मध्ये पडावे लागलं. इतर टीम सहकार्‍यांनी मग प्रवीण कुमारला आवरले.

close