माजी गृहसचिव बी. जी. देशमुख यांचे निधन

August 7, 2011 4:26 PM0 commentsViews: 5

07 ऑगस्ट

माजी केंद्रीय गृहसचिव बी. जी. देशमुख यांचे आज पुण्यातील नोबल हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 82 वर्षाचे होते. त्यांचं 'फ्रॉम पूना टू प्राईम मिनिस्टर्स ऑफिस हे पुस्तक लोकप्रिय झालं होतं. बी. जी. देशमुख 1951 साली भारतीय प्रशासकीय सेवेत सामिल झाले.

सप्टेबर1986 त मार्च 1989 काळात त्यांनी केंद्रीय गृहसचिव म्हणून कार्यभार सांभाळला. भारताचे तीन माजी पंतप्रधान राजीव गांधी, व्ही.पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात ते प्रधान सचिवही होते. निवृत्तीनंतर त्यांनी अनेक सामाजिक संस्थांच्या उपक्रमाना मोठी मदत केली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचेही ते अध्यक्ष होते. सामाजिक बांधिलकी जपणारा एक प्रामाणिक अधिकारी अशी बी. जींची ओळख आहे.

close