मुंबईच्या समुद्रात 15 टक्के तेल जमा !

August 8, 2011 10:01 AM0 commentsViews: 12

08 ऑगस्ट

मुंबईच्या समुद्र किनारी बुडालेल्या एम व्ही रॅकमधून होत असलेल्या तेलगळतीसंदर्भात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अर्थातच एमपीसीबीने राज्य सरकारला रिपोर्ट सादर केला आहे. मुंबईच्या समुद्रामधील पाण्यात 15 टक्के तेल जमा झालय असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

यावर आज डीजी शिपिंग आणि एमपीसीबी अधिकार्‍यांची बैठक आहे. जहाज बुडालं त्यावेळी 60 हजार मेट्रीक टन कोळसा तसेच 290 टन तेल साठा देखील होता. त्यानंतर रविवारी सकाळपासून एम व्ही रॅक जिथं बुडाले त्या परिसरात मोठ्या प्रमाणात तेल पसरल्याचे कोस्ट गार्डला आढळून आलं. तेलाचा तवंग आटोक्यात आणण्यासाठी ऑपरेशन पर्यावरण सुरक्षा हाती घेतलं.

ज्या ठिकाणी जहाजाने जलसमाधी घेतली त्याठिकाणी कोस्टगार्डची प्रदुषण रोखणारे आसीजीएस समुद्र प्रहरी हे जहाज तैनात करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तेल तवंग नष्ट करण्यासाठी डोनिअर विमानाच्या सहाय्याने तेल तवंग पसरलेल्या 21 किलोमीटरच्या पट्‌ट्यात केमिकलची फवारणी करण्यात येत आहे.

close