कलमाडी पुन्हा येणार अडचणीत

August 8, 2011 2:20 PM0 commentsViews:

08 ऑगस्ट

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्यामुळे तुरूंगाची हवा खाणारे सुरेश कलमाडी पुन्हा अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. पुण्यात पार पडलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा सविस्तर लेखा अहवाल देण्याची विनंती महालेखापरिक्षकांना करण्यात आली. राज्य लोकलेखा समितीने ही विनंती केली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा संशय असून सुरेश कलमाडी त्याचे आयोजक होते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी त्यासंदर्भात महालेखापरिक्षकांना विनंती केली. 2008 मध्ये झालेल्या या स्पर्धेवर 450 कोटी रुपये खर्च झाले होते.

close