नगरसेवकांनी फेकला महापौर,आयुक्तांच्या अंगावर कचरा

August 8, 2011 3:01 PM0 commentsViews: 2

08 ऑगस्ट

शहरातल्या कचर्‍याच्या मुद्यावरून नांदेड महापालिकेत आज आखाडा रंगला. सर्वसाधारण सभा सुरू असतानाच सेना-भाजपच्या नगरसेवकांनी कचरा महापौर आणि आयुक्तांच्या अंगावर फेकला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आणि प्रकरण हाणामारीवर आले. युतीच्या नगरसेवकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. नंतर पोलिसांना बोलावण्यात आले आणि प्रकरण शांत झालं. याप्रकरणी 14 नगरसेवकांना निलंबित करण्यात आले. तर नऊ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close