लाहोर बादशाह टीमनं पहिली फायनल मॅच जिंकली

November 14, 2008 7:37 PM0 commentsViews: 5

14 नोव्हेंबरआयसीएलच्या दुस-या हंगामात लाहोर बादशाह टीमनं हैदराबाद हिरोजचा पराभव करत पहिली फायनल मॅच जिंकली. मात्र हा विजय त्यांच्यासाठी फारसा सोपा नव्हता. हैदराबाद हिरोजनं विजयासाठी त्यांच्यासमोर 171 रन्सचं आव्हान ठेवलं होतं.इमरान फरहतनं लाहोर टीमला चांगली सुरूवात करून दिली. त्याने 31 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी ठोकली. पण मॅचमध्ये खरी रंगत आणली ती अझर मेहमूदच्या बॅटिंगने. मॅचमध्ये निर्णायक क्षणी एक फोर आणि सिक्स मारत त्यानं टीमला विजय मिळवून दिला. फायनलला पोहोचलेल्या दोन्ही टीम्समध्ये तीन मॅच होणार असून त्यातल्या दोन मॅच आधी जिंकणारी टीम विजयी होईल. लाहोर बादशाह टीमनं आता हैदराबाद हिरोवर एक शून्यने आघाडी घेतली आहे.

close